विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra

Spread the love

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र ( VSK ) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संकलित चाचणी क्रमांक 01 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे भरावे ? जाणून घ्या|

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

अंतरजिल्हा बदली ला सुरुवात

puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अहर्ता (सुधारित )|

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra

१. Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.

२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा

वापर करावा.

४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी. १०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot (चॅटबॉट) वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.

मार्गदर्शक video

1 thought on “विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra”

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह