केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अहर्ता (सुधारित )|kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised

Spread the love

kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अहर्ता (सुधारित )

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ ” चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८ / १२ / २०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

सुधारित वेळापत्रक

पदकेंद्रप्रमुख
महत्त्वाच्या घटनांच्या तारखा पुन्हा उघडल्या
अर्जाच्या ऑनलाइन नोंदणीची सुरुवात01/12/2023
अर्जाची नोंदणी शेवटची तारीख 08/12/2023
अर्ज तपशील संपादित करण्यासाठी शेवटची तारीख 08/12/2023
तुमचा अर्ज छापण्याची(प्रिंट) शेवटची तारीख 23/12/2023
ऑनलाइन फी भरणे01/12/2023 to 08/12/2023
kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised

अहर्ता (सुधारित )

 केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

वाचा   खुशखबर शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ| Good news Doubling the salary of shikhshan sevak

[केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३|maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link]

तयारी केंद्रप्रमुख भरती २०२३ ; ऑनलाइन चाचणी आणि डाउनलोड करण्यासाठी मोफत mcqs pdf

शासन निर्णय:-

मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१, ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.

वाचा   मुद्दत वाढ- पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023|pavitra portal started shikshak bharti 2023 maharashtra

०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-

२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:-

मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.

वाचा   डी.एड. कॉलेज बंद? बीएड अभ्यासक्रम आता चार वर्षांचा|Will the D.Ed. colleges close? The BEd course will now last a period of four years, in accordance with educational strategy

२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:-

ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.

०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.

०४. सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२७१२२३५५३४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

अर्ज करण्याची मुदत ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. ०१/१२/२०२३ ते ०८ / १२ / २०२३ या कालावधीत अर्ज करता येतील.
केंद्रप्रमुख परीक्षा माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे
केंद्रप्रमुख अर्ज लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

परिपत्रक

kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised

kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised

1 thought on “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अहर्ता (सुधारित )|kendra pramukh vibhagiy maryadit spardha pariksha 2023 qualification- revised”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात