केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३|maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

Spread the love

केंद्रप्रमुख भरती 2023| maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023: केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ ” चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८ / १२ / २०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८२/ टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

त्यानुसार शासन निर्णय संकिर्ण २०२२/प्र.क्र.८१/ टीएनटी-०१, दि. २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२३ ते दि. ०८ / १२ / २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने नुकतीच राज्याच्या परीक्षा पद्धतीतील फसव्या कारवायांवर कारवाई केली आहे. परिणामी, बोर्डाने भविष्यातील सर्व परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IBPS ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे जी बँकिंग क्षेत्र आणि इतर सरकारी विभागांसाठी विविध परीक्षा घेते. या कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

बैठकीमध्ये केंद्रप्रमुख भरती बाबत महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे.

👉 केंद्रप्रमुख परीक्षेची कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत सुरू आहे.

👉 परीक्षा ही IBPS मार्फत घेण्यात येणार.

👉 परीक्षा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

👉 परीक्षेचा निकाल – यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

👉 नियुक्ती यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

या सर्वांचे नियोजन अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी करावे असे बैठकीमध्ये सुचविले आहे.


अर्ज करण्याची मुदत ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील.
केंद्रप्रमुख परीक्षा माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे
केंद्रप्रमुख अर्ज लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

परीक्षा शुल्क


1.सर्व संवर्गातील उमेदवार – 950 रुपये
2.दिव्यांग उमेदवार – 850 रुपये

केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अहर्ता (सुधारित )


विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची
बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा
(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. “

वेतन


केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : S15 – 41800-132300

परीक्षेची स्वरूप

केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.

अभ्यासक्रम

अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप:-

उपघटक 1 : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, 2011 ( अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.

) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.

ड)विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.

इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.

उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने

उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepapr 23

या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा ‘शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी x ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

(ब) आकारमान 200 X 300 pixels

फाईल साईज 20kb50kb

स्वाक्षरी – उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 140 X 60 pixels

फाईल साईज 10kb-20kb

(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी X ३ सेमी पांढऱ्या कागदावर काळया / निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.

आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI

-फाईल साईज 20kb 50kb

(ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व- हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया / निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI-

फाईल साईज – 50kb-100 kb

maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link
maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

अभ्यासक्रम

केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

पेपर क्रमांक एक – बुद्धिमत्ता व अभियोग्यता


बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.


केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

  • केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक – डॉ
  • शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
  • केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी – के सागर (चौथी आवृत्ती)
  • संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
  • शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी – स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका – डॉ.शशिकांत अन्नदाते
    पेपर – 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह

विवरण

  • .भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी – 10 गुण
  • 2 शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी – 10 गुण
  • माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध – 15 गुण
  • अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी – 15 गुण
  • माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी – 20 गुण
  • वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
  • संप्रेषण कौशल्य – 15 गुण
    एकूण – 100 गुण

केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ


.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के’सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती)
सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

  • केंद्रप्रमुख पेपर 2 व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न – स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स
  • शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
  • संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न – डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)
  • शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
  • शिक्षणातील नवविचारप्रवाह – डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन
  • शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

रिक्त पद संख्या

maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link
maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

महत्वाचे pdf

जाहिरात

सविस्तर मार्गदर्शन

इतर शुभेछा संदेश संग्रह

मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

4 thoughts on “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३|maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link”

Leave a comment

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023