Table of Contents
खुशखबर शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ
शिक्षण सेवकांच्या मांधणा मध्ये वाढ करण्यात आली असून सुधारित वेतन 01 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे. ह्या मुळे अल्प मानधना वर काम करणारे शिक्षकांना खूप दिलासा मिळालेला आहे. (Good news Doubling the salary of shikhshan sevak)
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. १३६७/२०२२ मध्ये, दिनांक ३०.०६.२०२२ रोजी, शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यास देय किमान वेतनाएवढे सुधारीत करण्यात यावे. तसेच मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारीत करण्यात यावेत.
शिक्षण सेवकांना रुपये १५,०००/- ते रुपये २०,०००/- दरम्यान मानधन अदा करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील दि.२२.०९.२०२२ रोजी बैठक पार पडली असून, सदर बैठकीत शिक्षण सेवकांची मानधनवाढ निश्चित करण्यात आली असून, त्यास मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
मा. न्यायालयाचे उक्त आदेश व शिक्षण सेवकांच्या मानधनात बऱ्याच कालावधीपासून न झालेली वाढ यास्तव मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Good news: Doubling the salary of shikhshan sevak)
त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
imp notification about maha tait 2023
शासन निर्णय:
मंत्रीमंडळाने दिनांक २२.१२.२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात खालीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-
click here for job related post
शिक्षण सेवकांचे वर्ग | शासन निर्णय दिनांक सुधारित मानधन १७.०९.२०११ अन्वये सध्या देण्यात येणारे मानधन | सुधारित मानधन |
प्राथमिक व उच्च प्राथमिक | 6000/- | 16000/- |
माध्यमिक | 8000/- | 18000/- |
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय | 9000/- | 20000/- |
शिक्षण सेवकांना मानधनातील वाढ ही दि.०१ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र. १०६६/व्यय ५, दि. ०७.११.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२०७१३२६४९०५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
मार्च २०२३ माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket )
1 thought on “खुशखबर शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ| Good news Doubling the salary of shikhshan sevak”