Table of Contents
SSC 10th Result 2021 Maharashtra Board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC 10th Result 2021 Maharashtra Board) पुणे ,नागपूर ,औरंगाबाद ,मुंबई, कोल्हापूर, अमरावती ,नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार म्हणजे आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे .
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेल्या गुण खालील संकेतस्थळा वरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट घेता येईल मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत
result लिंक
result is live now..
सन २०२०-२१ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववी चा अंतिम निकाल ,इयत्ता दहावीचा वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावी चे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळा मार्फत विद्यार्थ्यांना विषय निहाय गुणदान करण्यात आले आहे.
त्यामुळे मंडळाने विविध कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे दिनांक २८ मे २०२१ रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार सण २०२१ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता १० वी परीक्षेस श्रेणी सुधार योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही सदर सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधी पैकी या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक-दोन संधी उपलब्ध राहतील
सेतू अभ्यास क्रम दैनंदिन प्राप्त करण्या करिता येथे क्लिक करा