Table of Contents
maha ssc online application form starts from 19th October
इयत्ता 10 ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास सुरुवात १९ ऑक्टोबर पासून
इयत्ता १ 0 वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ) परीक्षा ०२ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे त्या करिता विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यास सुरुवात दिनांक १९/ १० /२०२२ पासून सुरु होत आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrolment Certificate) खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची
तारखा व तपशील खालील प्रमाणे
मुद्दत वाढ
माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
बुधवार दि. १९/१०/२०२२ ते गुरुवार दि. १०/११/२०२२ २५/११/२०२२
नियमित शुल्कासह
| माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
शुक्रवार दि. ११/११/२०२२ ते शुक्रवार दि. २५/११/२०२२
नियमित शुल्कासह
माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा
गुरुवार दि. २० / १० / २०२२ मंगळवार दि. २९ / ११ / २०२२
इयत्ता १०वी २०२३ चे वेळापत्रक डाउनलोड करा
maha ssc online application form starts from 19th October
(अ) आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना शाळा Login मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत Pre-list वर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.
ब) माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व Pre-list करावयाची तारीख गुरुवार दि. ०१ / १२ / २०२२ अशी राहील.
हे हि वाचा
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेची 2023-24 दरम्यान इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी रिक्त जागांवर
प्रश्नमंजुषा- शिक्षक दिनाविषयी
इ.१०वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्द्तीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
१. शासन निर्णय क.गव्ह.१५१७/प्र.क.१९/संगणक दि.१४/०८/२०१७ नुसार माध्यमिक शाळांनी नियमीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. सदर Saral Data वरुनच नियमीत विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.
२. पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrollment Certificate) खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊज व ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) घेवून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती Saral Data मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे (कॉलम नं.३ नुसार) निश्चित करण्यात आल्या आहेत.
३. कौशल्य सेतु अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील online पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलीत पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्डकॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.
४. खालील तपशीलाप्रमाणे विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क खाली नमूद केलेल्या बँकेच्या चलनावरील नमूद मंडळाच्या Virtual Account मध्ये RTGS/NEFT द्वारे भरणा करुन चलनाची प्रत तसेच विद्याथ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
- १. पुणे, औरंगाबाद व कोल्हापूर :- Bank of India Virtual Account
- २. मुंबई, नागपूर व लातूर :- HDFC Bank Virtual Account
- ३. अमरावती, नाशिक व कोकण – AXIS Bank Virtual Account
५. आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व माध्यमिक शाळांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करुन चलनावरील नमूदप्रमाणे मंडळाच्या Virtual Account मध्ये NEFT/RTGS व्दारे वर्ग करावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी NEFT/RTGS व्दारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Number व IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील.
६. माध्यमिक शाळांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करुन दिली जाणार नाहीत. सदर बाब सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून दयावी. माध्यमिक शाळांनी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा विभागीय मंडळ स्तरावर करुन त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमुन्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्द्तीने उपलब्ध करुन देण्यात येतील.
७. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाव्दारेच भरण्यात यावे.
८. मार्च २०२३ मधील परीक्षेसाठी मार्च २०२२ अथवा जुलै-ऑगस्ट २०२२ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअतंर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन माध्यमिक शाळांना देण्यातयाव्यात.
९. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेव्दारे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे
१०. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.