Indian Army Agniveer Recruitment 2023 Indian Army Agniveer Recruitmently And Physically Fit

Spread the love

भारतीय सैन्य दलाकडून (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. मानसिक स्वास्थ आणि शारीरिक स्वास्थ यांचा योग्य समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने (Indian Army) भरती प्रक्रियेत बदल केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (22 फेब्रुवारी) यासंदर्भात माहिती दिली आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार असून यामध्ये शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केल्याची माहिती देत सांगितले की, मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल. 

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड

भारतील लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र आता लेखी परीक्षा ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे महत्त्वाचं असणार आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल. 

वाचा   upsc Recruitment 2023 For Various Posts To Fill Total 577 Vacancies In epfo Govt Job Vacancy

अग्निवीर भरतीसाठी 500 रुपये शुल्क

कर्नल सुरेश यांनी पुढे माहिती दिली की, भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देणार आहे. तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागतील. 

भरती प्रक्रिया तीन टप्प्यात

अग्निवीर म्हणून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी वर्षातून एकदाच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरतीपूर्वी संगणकावर आधारित ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) घेतली जाईल. अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई (CEE), शारीरिक चाचणी (Physical Test) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेण्यात येईल.

वाचा   Recruitment In Ulhasnagar Municipal Corporation Thane ESIS Hospital Know About Vacancy

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Categories job

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d