upsc Recruitment 2023 For Various Posts To Fill Total 577 Vacancies In epfo Govt Job Vacancy

Spread the love

UPSC EPFO Recruitment 2023 : तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govenment Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. UPSC ने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि लेखापाल अधिकारी या पदांवर भरती करण्यात येणार आहे.जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रियेला सुरुवात

या UPSC भरती 2023 (UPSC EPFO ​​Recruitment) साठी 25 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवार 17 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीमध्ये 500 हून अधिक रिक्त जागा भरल्या जातील. निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिलं जाईल.

वाचा   इंडिया पोस्ट Gds भर्ती 2023 40889 पदांसाठी Indiapostgdsonline Gov In येथे अर्ज करा

UPSC EPFO Vacancy 2023 : रिक्त पदांचा तपशील

UPSC EPFO भरती अंतर्गत 577 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती करण्यात येईल. त्यापैकी 418 रिक्त पदे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतील अंमलबजावणी अधिकारी तसेच लेखा अधिकारी या पदांसाठी आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदासाठी 115 जागा रिक्त आहेत.

वाचा   शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल: आजची खुशखबर Age limit relaxed for government jobs: Today's good news

UPSC EPFO Recruitment 2023 : कशी असेल निवड प्रक्रिया?

या भरतीअंतर्गत पदांसाठी उमेदवारांची निवड UPSC कडून लेखी चाचणी आणि मुलाखत या टप्प्यांत घेण्यात येईल. यूपीएससीने सांगितले की दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जातील आणि वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. मात्र, जारी केलेल्या अधिसूचनेत परीक्षेचा अभ्यासक्रम आणि योजना देण्यात आली आहे.

UPSC EPFO Recruitment 2023 : ऑनलाईन अर्ज दाख करण्याची प्रक्रिया

  • UPSC च्या अधिकृत upsconline.nic.in वेबसाईटवर जा.
  • होम पेजवर One Time Registration (OTR) for examinations of UPSC and online application लिंक वर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा.
  • आता स्क्रीनवर दिसत असलेला अर्ज नीट भरा.
  • अर्जाची फी भरा.
  • सबमिट करुन दाखल केलेला फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढा.
Categories job

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: