BOI भरती 2023 मध्ये Bankofindia Co मध्ये 500 पदांसाठी अर्ज करा मराठी बातम्या| BOI Recruitment 2023 Apply For 500 Posts At Bank of india Co In Marathi

Spread the love

BOI PO Recruitment 2023: तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ इंडियानं (Bank of India Recruitment) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेत 500 पदांची भरती (Bank Recruitment) होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in ला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार आजपासून या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची (Vacancy Application) अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

वाचा   recruitment For Various Posts In IDBI Bank And India Post Payments Bank 

भरती अधिसूचनेनुसार, ही मोहीम सामान्य बँकिंग स्ट्रीममध्ये क्रेडिट ऑफिसरच्या 350 पदं आणि स्पेशालिस्ट स्ट्रीममध्ये IT ऑफिसरच्या 150 पदांच्या भरतीसाठी चालवली जाईल. JMGS-I मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती बँकिंग आणि फायनान्स (PGDBF) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही प्रवाहात पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच, आयटी अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणक विज्ञान आणि संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदवी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वाचा   वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि महावितरण अमरावती मध्ये विविध पदांसाठी नोकरी माझा भरती Recruitment For Various Posts In Western Coalfield Limited And Mahavitaran Amravati

वयोगट

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 29 वर्षांच्या दरम्यान असावं. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाईल. 

कशी होणार निवड? 

बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या जागांवर उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट, जीडी (GD) आणि पर्सनल इंटव्ह्यूमार्फत (Interview) केली जाईल. 

किती भरावं लागणार अर्ज शुल्क? 

भरतीसाठी (Recruitment) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावं लागेल. सामान्य / EWS / OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर, SC/ST/PWD उमेदवारांसाठी कमाल वय 175 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

वाचा   Indian Army Agniveer Recruitment 2023 Indian Army Agniveer Recruitmently And Physically Fit

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन आणि महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती 

Source link

Categories job

Leave a Reply

भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत
भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत