DMart वर्धापन दिन भेट लिंक खरी किंवा बनावट:
d-mart anniversary gift link real or fake: 2021 :सायबर घोटाळे हे खूप सामान्य झाले आहेत आणि आजकाल सर्वात अलीकडील चर्चा चालत आहे ती म्हणजे DMart बनावट लिंक घोटाळा. DMart एक सुपरमार्केट आहे आणि त्याच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त, व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारे बनावट लिंक संदेश फॉरवर्ड केले जात आहेत.
प्रश्नोत्तराच्या आधारे आपण जाणून घेवूया , DMart वर्धापन दिन भेट लिंक वास्तविक किंवा बनावट:
बनावट लिंक म्हणजे काय ?
कोणत्याही बड्या कंपन्याच्या नावे एक वेबसाईट तयार करणे.(थोडे बदल करून नामांकित कंपन्यासारखे बनावट वेबसाईट तयार करतात व त्याचा प्रसार करतात )
बनावट लिंक का तयार करतात ?
बनावट लिंक आजच्या काळात फसवणुकीचे प्रकार आहे . फ्री गिफ्ट वावूचर ,फ्री गिफ्ट, cashback ,फ्री गिफ्ट कुपन ,बक्षिस व अश्याच प्रकारे लोकांना आकर्षित करतात व लोक य जाळ्यात अडकतात व आपला आर्थिक नुकसान स्वतः करून घेतात.
बनावट लिंक चा प्रसार कोण करतात ?
इंटरनेट वर फसवणूक करणारे वरील सांगितल्या प्रमाणे एक बनावट लिंक तयार करतात व बक्षिस जाहीर करतात व अश्या लिंक कोणत्याही एक WhatsApp ग्रुप वर पाठवतात मग काय …… आम्ही बक्षिसाच्या लालसे पोटी कोणतीही खबरदारी न घेता सहज क्लिक करतो व फसवणुकीला बळी पडतो .
सायबर सेक्युरिटी वरील महत्वाचे आमचे लेख
how to keep your WhatsApp safe; info in Marathi
How to protect your Instagram account and how to avoid hacks 2021
२०२१ मध्ये गुगल पे बरोबर सुरक्षित व्यवहार कश्या प्रकारे करावे?You have to know
आपले सिम कार्ड हॅकर्सपासून कसे संरक्षित करावे.
फोनपे बरोबर सुरक्षित डिजिटल पेमेंट कसे कराल
बनावट लिंक वर क्लिक केल्याने काय होते ?
WhatsApp द्वारे आपल्या मित्रांकडून अशीच एक आपल्या मोबाईल वर येते व आपण सहज क्लिक करतो त्या नंतर काय होते ? तर टी लिंक एक फेक वेबसाईट वर घेवून जाते . तेथे आकर्षक पद्धतीने एनिमेशन ,इमेज चा प्रयोग करून आकर्षक वेब पेज तयार केलेला असतो , तेथे एक व्हील (चक्र ) दिलेला असतो व क्लिक करण्यास सांगितले जाते व एक रक्कम किंवा वस्तू वर ते चक्र थांबते व सांगितले जाते कि जर आपल्याला हा बक्षिश मिळवायचा असेल तर आपल्या १० /१५/२० मित्रांना किंवा ग्रुप वर पाठविण्यास सांगीतले जाते , आपण एका प्रकारे ह्या फेक मेसेज ला वायरल करत आहोत हे आल्याला समाजात नाही .( नवीन प्रकार सुरु आहे क्विझ दिली जाते वा बक्षिस जिंकल्याचे आमिष देतात )
आपण तो मेसेज १० मित्रांना पाठवल्या नंतर काय होत ?
आपण आपल्या मित्रांना /ग्रुप वर मेसेज पाठवलं नंतर हे scammer (घोटाळा करणारे ) आपल्या कडून आपली खाजगी माहिती घेतात /बँक डिटेल /पत्ता /paytm no इत्यादी घेतात व हे scammer तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपली मेहनतीची रक्कम बळकावतात . ह्याला online Froud (चोरी) म्हणतात.
फक्त आपला पैसाच तर चोरला जातो ना ….
चूक, पैश्याहून म्हत्वाचे आपले खाजगी जीवन आहे. कारण पैसा गेला तर पुन्हा कमवू शकतो पण …तुमच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याचा कोणालाही हक्क नाही . जेव्हा तुम्ही कोणत्याही बनावट लिंक ला क्लिक केलात तर आपल्या मोबाईल चा data (आपले contact no. / फोटो/ विडीव्हो /g-मेल अकौंट व इत्यादी ) चोरी जाण्याची शक्यता आहे . म्हणजे आपण स्वताहून आपला data त्यांना देतोय व य माहिती चा scammer कसा उपयोग करतील याचा अंदाज तुम्हा आम्हाला शक्य नाही.
काही महत्वाचे दुवे .
शिक्षक मेगा भरती महाराष्ट्र 2021
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१
NMMS interim answer key 2021 ; download now
National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)
काय खबरदारी घ्यावी ?
प्रथम त्या लिंक ची तपासणी करा ,
म्हणजे ती लिंक जी एखाद्या मोफत बक्षीस देण्याची बतावणी करतोय , ज्या बक्षीस साठी आपण कोणतीही मानसिक /शारीरिक/स्पर्धा मेहनत घेतलेली नसते. अश्या लिंक वर क्लिक करू नये. व कोणालाही पाठवू नये.
कोणत्या लिंक अधिकृत आहेत कसे कळणार ?
सर्वप्रथम त्यालींक ची सुरुवात https ने झाली असेल.(https ने सुरु झाली म्हणजे अधिकृत असेल असेही नाही – पडताळणी करावी)
तुम्ही मोबाईल द्वारा सर्फिंग करत असाल तर ब्राउजर आपल्याला चेतावणी देखील करतो.
तुमची व्यक्तीक माहिती/पिन इत्यादी मागितली जात नाही ना …खबरदारी घ्यावी
स्मार्ट फोन चा वापर करायचा कि नाही ?
करा पण , जस अतुमचा मोबाईल स्मार्ट आहे तसच तुम्हाला देखील स्मार्ट व्हाव लागेल.
लेख आवडला असल्यास मित्रांना शेर करा ,