Recruitment At Konkan Railway Thane Municipality Maharashtra Employees State Insurance Institute Pune

Spread the love

JOB MAJHA : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Opportunity) शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी, 1 वर्षे अनुभव.

एकूण जागा – 1

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : हेड ऑफीस यूएबीआरएल, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्सक्टेशन- त्रिकुता नगर, जम्मू, जम्मू-काश्मीर 180011

मुलाखत दिनांक : 3 मार्च 2023

अधिकृत तपशील – konkanrailway.com

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस

एकूण जागा – 49

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी – 57 वर्ष, खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्ष

मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/90, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीची तारीख – 22 & 23 फेब्रुवारी 2023

तपशील – etablishpune.amo@gmail.com

ठाणे महानगरपालिका

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय तज्ज्ञ

पात्रता : एमबीबीएस / एमडी

एकूण जागा – 18

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : लवकरच

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

सोबत या ठिकाणीही भरती सुरू- 

बँक ऑफ इंडिया

  • पोस्ट – प्रोबेशनरी ऑफिसर (क्रेडिट ऑफिसर, IT ऑफिसर)
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी
  • एकूण जागा – 500  (यात क्रेडिट ऑफिसरसाठी 350 आणि IT ऑफिसरसाठी 150 जागा आहेत.)
  • वयोमर्यादा – 20 ते 29 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव

  • पोस्ट – अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता – आठवी ते दहावी पास
  • एकूण जागा – 135
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
  • लवकरात लवकर अर्ज करा.

Categories job

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये