जिल्हापरिषद गट क पद भारती|Zilla Parishad Group C Post Bharti; Format of question paper quality and marks of question paper

Spread the love

Zilla Parishad Group C Post Bharti; Format of question paper quality and marks of question paper

जिल्हापरिषद गट क पद भरती ; प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण

शासन परिपत्रक क्र. एपीटी २०१४/प्र.क्र-१३९/आस्था-८, दिनांक ५ जुलै, २०१४ नुसार जिल्हा परिषदेतील गट-क पदांसाठीचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण स्पष्ट केलेले आहे.

त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक: प्राणिम १२२२ / प्र.क्र-५४/ का.१३-अ दिनांक ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

वाचा   upsc Recruitment 2023 For Various Posts To Fill Total 577 Vacancies In epfo Govt Job Vacancy

दिनांक ५ जुलै, २०१४ चे शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ मध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धीमापन व गणित व तांत्रिक प्रश्न याबाबत प्रश्न व त्याला असणारे गुण निश्चित केलेले आहेत. त्याचबरोबर वरील विषयांची काठिण्य पातळी समजण्याकरता प्रश्नपत्रिकेचा दर्जाही निश्चित केलेला आहे.

प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासंदर्भात पुरेसे आकलन होत नव्हते, यावरून उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली गेली होती. त्यामुळे उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, दर्जा निश्चित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

वाचा   Recruitment For 225 Vacancies Of Various Posts In Bank Of Maharashtra

शासन परिपत्रक :-

ग्राम विकास विभागाकडील शासन परिपत्रक एपीटी २०१४/प्र. क्र-१३९/आस्था-८ दिनांक ५ जुलै, २०१४ व सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक: प्राणिम १२२२ / प्र. क्र- ५४/ का. १३-अ दिनांक ४ मे २०२२ यांचा विचार करून एकत्रित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत.

संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न, इंग्रजी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न, बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा (काठिण्य पातळी) व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

वाचा   ALERTE Income Taxpayers! Departments established a deadline; these taxpayers' PAN cards would be cancelled after March 31

परिशिष्ट ब

ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची काठिण्य पातळी (दर्जा) समजून येणेसाठी व उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५०९१६०२१६४६२० असा आहे.

शासन निर्णय व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण पीडीएफ

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात