मार्च २०२३ माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket )

Spread the love

मार्च २०२३ माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket )…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket ) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

वाचा   paper 01 class 8 guess answer sheet 2023

maha-ssc time table (updated)

notification

for more info

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket ) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

  1. मार्च २०२३ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
  2. प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
  3. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket ) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
  4. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket ) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
  5. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
  6. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
वाचा   bridge course 2023; weekly online test class 4

तरी मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

1 thought on “मार्च २०२३ माध्यमिक शालान्त (इ. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket )”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात