CISF Recruitment 2023: सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ने एक अधिसूचना जारी करून बंपर पदासाठी भरतीची (Recruitment 2023) घोषणा केली आहे. अधिसूचनेनुसार, Central Industrial Security Force मध्ये 451 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांची भरती (Vaccancy) केली जाईल. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू (Application Process Will Start Soon) होईल. 23 जानेवारी 2023 पासून उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट www.cisfrectt.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतील. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
CISF Recruitment 2023: रिक्त जागांचा तपशील
अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. त्यापैकी 183 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी आहेत.
CISF Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
CISF Recruitment 2023: वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावं.
CISF Jobs 2023: अर्ज शुल्क किती असेल?
CISF च्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. SC/ST/EMS उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
CISF Vaccancy 2023: अर्ज कसा कराल?
रिक्त जागांवर अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 22 फेब्रुवारीपूर्वी अर्ज करावा लागेल.