इंडिया पोस्ट Gds भर्ती 2023 40889 पदांसाठी Indiapostgdsonline Gov In येथे अर्ज करा

Spread the love

India Post GDS Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. अलीकडेच, टपाल विभागाने हजारो पदांच्या भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे नमूद केलेल्या माहितीच्या आधारे भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वाचा   paper 01 class 8 guess answer sheet 2023

भारतीय पोस्टची ही भरती मोहीम ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 40,889 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे देशभरात जीडीएसची पदं भरली जाणार आहेत. GDS पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा 

अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार, कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

वाचा   Vacancy In Air India Airport Services Limited Know About It

वेतनश्रेणी 

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 10,000 रुपये ते 24,470 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

कशी होणार निवड? 

या पदांसाठी अर्जदारांची निवड इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क किती असेल? 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

वाचा   वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि महावितरण अमरावती मध्ये विविध पदांसाठी नोकरी माझा भरती Recruitment For Various Posts In Western Coalfield Limited And Mahavitaran Amravati

कसा कराल अर्ज? 

स्टेप 1: सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in  वर भेट द्या. 
स्टेप 2: त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. 
स्टेप 3: आता उमेदवार अर्ज भरा. 
स्टेप 4: अर्जात विचारल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप 5: आता अर्ज शुल्क भरा. 
स्टेप 6: भरलेला फॉर्म सबमिट करावा. 
स्टेप 7: फॉर्म सबमिट झाल्यानंतर डाऊनलोड करावा. 
स्टेप 8: फॉर्मची एक प्रिंटआऊट काढून स्वतःजवळ ठेवा. 

Source link

Categories job

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d