Fan speed and electricity utilisation depend on the regulator; learn more

Spread the love

Fan speed and electricity utilisation depend on the regulator; learn more

पंख्याचा वेग आणि विजेचा वापर रेग्युलेटरवर अवलंबून असतो; अधिक जाणून घ्या

Fan Speed And Electricity: उन्हाळ्यामध्ये वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वीजेचं बिलही अधिक येतं. लाईट बिलचा विचार करुन उन्हाळ्यामध्ये घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणंही लोक जपून वापरतात. लाईट बिल कमी यावं किंवा नियंत्रणात रहावं असा प्रयत्न सर्वांच्याच घरी केला जातो. अनेक जण कमी वीज वापरण्याच्या उद्देशाने एसी सुद्धा कमी तापमनावर चालवत नाहीत. अनेक घरांमध्ये असाच प्रकार पंख्याबद्दलही दिसून येतो. म्हणजे फॅनचा रेग्युलेटर कमीत कमी संख्येवर ठेवल्यास वीज वाचते असा अनेकांचा समज असतो. उदाहरण घ्यायचं झालं वेगाच्याबाबतीत 1 वर ठेवलेला पंखा हा 5 वर ठेवलेल्या पंख्यापेक्षा कमी वीज वापरतो असा एक समज आहे.

वाचा   how to activate e-payment in pfms

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की पंखा वेगवेगळ्या वेगात फिरला आणि रेग्युलेटर कमी क्रमांकावर टेवल्यास त्याचा वीजेच्या वापरावर काही फरक पडतो का? दर उन्हाळ्यात वाढीव वीज बिलांमुळे चर्चेत असणारा हा पंख्यांच्या वेगाचं आणि वीज वापराचं काही कनेक्शन खरोखर असतं का हे आपण जाणून घेणार आहोत.

रेग्युलेटर महत्त्वाचा

थेट सांगायचं झाल्यास पंख्यासाठी वापरली जाणारी वीज आणि त्याचा वेग यांचा संबंध असतो. मात्र हा वीजवापर मोठ्याप्रमाणात रेग्युलेटवरही अवलंबून असतो. पंख्याचा वेग कंट्रोल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेग्युलेटरवर वीजेचा वापर कमी होतो की अधिक हे निर्भर असतं. मात्र सध्या अनेक असेल रेल्युलेटर बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्यांचा वीजेच्या वापराशी काहीही थेट संबंध नसतो. हे रेग्युलेटर एका नियंत्रित विद्युतप्रवाहामध्येच पंख्याचा वेग नियंत्रित करतात.

वाचा   अंतरजिल्हा बदली ला सुरुवात|The transfer of Zilla Parishad teachers has started from 12th to 15 December on ottmahardd.com

वीज बचत होणार की नाही हे रेग्युलेटरमुळे ठरतं

रेग्युलेटरच्या प्रकार पंख्याचा वेग हा वीजेच्या वापराशी संबंधित आहे की नाही हे ठरवतो. म्हणजेच रेग्युलेटर कोणता आहे यावर वीजेची बचत होणार की अधिक वेगाने फिरण्यासाठी पंख्याला अधिक वीज लागणार हे ठरवतो. अनेक रेग्युलेटर हे फॅनसाठी वापरल्या जाणाऱ्या वीज प्रवाहाचा व्होल्टेज कमी करुन पंख्याचा वेग नियंत्रित करतात.

…तेव्हा रेग्युलेटर रेझिस्टरसारखा काम करतो

हे रेग्युलेटर पंख्याला पुरवठा होणाऱ्या वीजेचा व्होल्टेज कमी करुन वेग नियंत्रणात ठेवतात. यामुळे पंख्यासाठी कमी वीज लागते. मात्र अनेकदा यामुळे वीजेची बचत होत नाही कारण अशा परिस्थितीत रेग्युलेटर रेझिस्टरसारखा काम करतो. त्यामुळेच पंख्याचा वेग कमी करुन वीजेचा वापर कमी करता येत नाही.

जुने रेग्युलेटर

ही सिस्टीम जुन्या रेग्युलेटर्समध्ये होती जे आकाराने थोडे मोठे असायचे. मात्र आता नवीन तंत्रज्ञानामुसार रेग्युलेटर्समध्येही मोठा बदल झाला आहे. नवे रेग्युलेटर्स हे वेगवगेळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करतात ज्यामुळे वीजेची बचत होते.

वाचा   mscepune वरून -maha tait 2022 मधील नमुना पेपर आणि महत्वाची माहिती| sample paper and important info from -maha tait 2022 from mscepune

वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते वीज

सध्या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे पारंपारिक रेग्युलेटरपेक्षा अधिक प्रभावी असतात असं सांगितलं जातं. या नव्या रेग्युलेटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबचत शक्य होते. या नव्या रेल्युलेटरमध्ये सर्वाधिक वेगात पंखा असताना वापरली जाणारी वीज आणि कमी वेगात पंखा असताना वापरली जाणारी वीज ही वेगवेगळ्या प्रमाणात असते.

रेग्युलेटर फॅनच्या गतीवर परिणाम करतो का?

होय, रेग्युलेटर फॅनच्या गतीवर परिणाम करू शकतो. रेग्युलेटरचा वापर वीज स्त्रोतापासून पंख्यापर्यंतचा वीज प्रवाह नियंत्रित करण्यासाठी केला जातो आणि किती वीज पुरवली जात आहे त्यानुसार पंख्याच्या गतीवर परिणाम होतो.

पंखा नियामक विजेच्या वापरावर कसा परिणाम करतो?

फॅन रेग्युलेटरचा वापर फॅनचा वेग नियंत्रित करून विजेच्या वापरावर परिणाम करू शकतो. पंख्याचा वेग नियंत्रित करून, विजेचा वापर कमी करण्यास मदत होऊ शकते. पंख्यावरील कमी वेग जास्त वेगापेक्षा कमी वीज वापरेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना योग्य गती सेटिंग निवडून त्यांचा वीज वापर नियंत्रित करता येईल.

फॅन स्पीड रेग्युलेटर ऊर्जा वाचवू शकतो?

होय, फॅन स्पीड रेग्युलेटर तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फॅनचा वेग समायोजित करण्याची परवानगी देऊन उर्जेची बचत करण्यात मदत करू शकतात, परिणामी कमी उर्जेचा वापर होतो.

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात