gunvataa yadi scholarship exam 5 and 8 of 2022

Spread the love

gunvataa yadi scholarship exam 5 and 8 of 2022

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८वी -२०२२ गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या मंगळवार दि. ०३/०१/२०२३ रोजी रात्री ०९.०० वाजता परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

दि. ३१ जुलै, २०२२ रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक ०७ / ११ / २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. ०७ / ११ / २०२२ ते १७ / ११ / २०२२ या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ गुणवत्ता यादी जाहीर

इयत्ता ५वी व ८वी गुणवत्ता यादी दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे . तालुका निहाय जिल्हा निहाय गुणवत्ता यादी पाहण्या करिता खालील लिंक वर क्लिक करा .

इतरांना शेर करा

जिल्हा निहाय ,संच निहाय किमान व कमाल गुण (इयत्ता ५ वी)

डाउनलोड pdf

जिल्हा निहाय ,संच निहाय किमान व कमाल गुण (इयत्ता ८ वी)

डाउनलोड pdf

जिल्हा निहाय, तालुका निहाय ,संच निहाय किमान व कमाल गुण (इयत्ता ५ वी) डाउनलोड pdf

अंतिम निकाल कसे चेक कराल ?

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वत:चा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.

• संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे

gunvataa yadi scholarship exam 5 and of 2022
gunvataa yadi scholarship exam 5 and of 2022

महत्वाचे लिंक

अंतिम निकाल

( click hereविद्यार्थ्यांसाठी)

गुणवत्ता यादी इयत्ता ५ वी

(click hereराज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)

गुणवत्ता यादी इयत्ता ८ वी

(click hereराज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)

शाळा सांख्यिकीय माहिती इयत्ता ५वी

(click here –जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

शाळा सांख्यिकीय माहिती इयत्ता ५वी

(click here –जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर

क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

read this also…

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.

१. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा

गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी.

२. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.

३. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.

४. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.

५. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.

• गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत-

परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते ) गुणपत्रक दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी व अंतिम गुणपत्रक प्रत मंगळवार दि. ०३ जानेवारी, २०२३ रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.

16 thoughts on “gunvataa yadi scholarship exam 5 and 8 of 2022”

Leave a comment

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025