In response to Elon Musk’s most recent initiative Twitter Blue, Mark Zuckerberg unveils Meta Verified membership service for Facebook and Instagram.

Spread the love

Facebook Blue Tick :  गेल्या काही वर्षात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची संख्या प्रचंड वाढली. यासोबतच स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती सोशल मीडिया नाही, असे क्वचितच पाहायला मिळते. त्यातच Facebook, Instagram आणि Twitter सारख्या अ‍ॅप्सचा वापर यात सर्वाधिक आहे. मात्र आता या अॅप्स संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आता पर्यंत Twitter ब्लू टीकसाठी पैसे मोजावे लागत होते, मात्र आता आता Facebook च्या ब्लू टीकसाठीसुद्धा पैसे मोजावे लागणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची (Facebook, Instagram, whatsapp) मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. मार्क झुकरबर्गच्या Mark Zuckerberg या फेसबुकबाबतच्या मोठ्या घोषणेनंतर फेसबुक यूजर्सनाही मोठा धक्का बसला आहे.   

फेसबूकसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार 

ट्विटरप्रमाणेच आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या मूळ कंपनी मेटानेही प्रीमियम व्हेरिफिकेशन सेवेची घोषणा केली आहे. म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी (Facebook Blue Tick) पैसे द्यावे लागतील. वेबसाठी त्याची किंमत $11.99 (रु. 993) आणि iOS साठी $14.99 (रु. 1241) ठेवण्यात आली आहे.

JUST IN – Zuckerberg copies Twitter: $12 bucks per month to get verified and receive a blue badge. pic.twitter.com/QrNH9KGMVI

— Disclose.tv (@disclosetv) February 19, 2023

या  देशांमध्ये ही सेवा सुरू 

कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या आठवड्यात ही सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रथमच सुरू होणार आहे. लवकरच ही सेवा इतर देशांमध्ये सुरू होणार आहे. वापरकर्ते त्यांच्या सरकारी ओळखपत्राद्वारे त्यांचे खाते सत्यापित करण्यास सक्षम असतील. या बदल्यात वापरकर्त्याच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा देखील दिली जाईल. मात्र, भारतात ही सेवा कधी सुरू होणार त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

वाचा: आज भारत-आयर्लंड थरार रंगणार, जाणून घ्या कोणाचं पारडं जड? 

18 वर्ष वय असावे

हे नवीन वैशिष्ट्य आमच्या सेवांमधील सत्यता आणि सुरक्षितता वाढविण्याबाबत आहे. Meta Verified साठी वापरकर्त्यांनी किमान क्रियाकलाप आवश्यकता पूर्ण करणे. तसेच ब्लू टिकसाठी किमान 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असणे आणि सरकारी आयडी सबमिट करणे आवश्यक आहे.

फेसबुकच्या ब्लू टीकबाबत काही घोषणा लवकरच जाहीर होतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होतीच. मात्र मेटा टीम यावर बऱ्याच काळापासून संशोधन करत होती. अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अखेर मार्कने फेसबुकच्या ब्लू टीकबाबत ही मोठी घोषणा केली. 

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये