राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग|One of my favorite Incidents in the life of Rajarshi Shahu Maharaj

Spread the love

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग|One of my favorite Incidents in the life of Rajarshi Shahu Maharaj

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील माझ्या आवडत्या घटनांपैकी एक: प्रेरणादायी नेतृत्वाची एक झलक

इतिहासाच्यामध्ये, काही घटना नेतृत्व आणि प्रेरणेचे उदाहरण म्हणून चमकतात. त्यापैकी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. ही घटना केवळ त्यांचे उल्लेखनीय चरित्रच अधोरेखित करत नाही तर समानता आणि सशक्तीकरणासाठी त्यांच्या अतूट वचनबद्धतेची अंतर्दृष्टी देखील देते.

या घटनेचा आपण सखोल अभ्यास करत असताना, त्याच्या जीवनाचा एक पैलू शोधून काढतो जो त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे सार आणि त्यांनी समाजावर सोडलेल्या चिरस्थायी प्रभावाशी प्रतिध्वनित होतो.

राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण|5 marathi essay on a memoir of Rajarshi Shahu Maharaj

शिक्षक दिनानिमित्त 5 सर्वोत्कृष्ट मराठी निबंध

पावसाळ्यावरील 5 छोटे निबंध

निबंध क्रमांक ०१

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट , महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सश्याच्या कानाला धरून दूर उभा राहीलेला महाराजांना दिसला. महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं, पारधी म्हणाला, ‘म्हाराजा, आपल्यासाठी मी ह्यो ससा मारून आणलाय. याचं कोरड्यास करुन जेव.’ हुजऱ्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं. दूपारी महाराजांच्यासह सगळे जण जेवायला बसले.

वाचा   राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण|5 marathi essay on a memoir of Rajarshi Shahu Maharaj

इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली. तो कुठं दिसेना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली. पारध्याला शोधून त्याला महाराजांकडं आणण्यात आलं.

महाराज पारध्याकडे पहात हुजऱ्यांना म्हणाले, “याला पान करून जेवायला बसवा.”

इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला, “महाराज याला कोठे बसवू? त्या झाडाखाली ?”

महाराज म्हणाले,” याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसवू का म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव.”

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.


निबंध क्रमांक ०२

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट , महायुद्धाच्या दरम्यान कुट-एल आमारा इथं हिंदी फौजा तुर्की वेढ्यात अडकल्या होत्या. सैन्याची संपुर्ण रसद संपली होती. आता घोडे मारून खाण्याची वेळ आली. पण हिंदी शिपायांनी घोडे खाण्यास नकार दिला. ते म्हणाले आम्ही घोडे खाल्ले तर पुन्हा हिंदूस्थानात गेल्यानंतर लोक वाळीत टाकतील. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना लेखी खलिता पाठवून संपुर्ण प्रकार कळवला.

वाचा   पावसाळ्यावरील 5 छोटे निबंध|[download pdf]The Joy of Rainy Season: Exploring the Magic of Rain for Kids

शाहू महाराजांनी हिंदी फौजांना निरोप पाठवला, “तुम्ही खुशाल घोड्याचं मांस खा. तुमच्या जातीपातीच्या, लग्नकार्यांची जबाबदारी मी घेतो. प्रसंगी तुमच्या परिवारातल्या आणि माझ्या संबधितामधल्या कुटुंबीयांमध्ये सोयरिकीची हमी मी घेतो.”

हा खलिता लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी फौजांना वाचून दाखवला तेव्हा भुकेनं व्याकुळ झालेल्या फौजेनं एकच जयघोष केला. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. शाहू महाराजांचा धर्माहून मोठा असणारा पगडा पाहून ब्रिटिश अधिकारी आश्यर्यचकित झाले.

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.


निबंध क्रमांक ०३

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट , १९०५ च्या जुलै महिन्यात महाराज नव्या राजवाड्यातून आपल्या फोर्ड मोटारीतून बाहेर पडले. गाडी चालवायला लिंगायत समाजाचा तरुण पोऱ्या होता. काही अंतरावर मोटारगाडीनं रस्ता सोडला आणि शेतवडीच्या तुंबलेल्या चिखलाच्या डबऱ्यात पडली. महाराज खाली पडले ते थेट चिखलात.

चिखलानं महाराज राड झाले. क्षणात संताप अनावर झाला आणि या संतापातच महाराजांनी ‘घातलस मला खड्ड्यात’ असं म्हणत त्या तरूण मुलाच्या पाठीवर चपलेनी तडाखा दिला. महाराज स्वत: ड्रायव्हिंग करत निघून गेले.

वाचा   शिक्षक दिनानिमित्त 5 सर्वोत्कृष्ट मराठी निबंध|5 best marathi essay on teachers day

दूसऱ्या दिवशी महाराजांच्या गाडीवर नवीन ड्रायव्हर होता. आपल्याला आलेल्या क्षणिक रागातून त्या मुलाला मारल्याचं महाराजांना वाईट वाटतं होतं. तो दिसला नाही, तेव्हा महाराजांनी त्या पोऱ्याला बोलवून घेतलं, तर तो रडत समोर आला.

महाराज म्हणाले, “का रं का रडतूयस ?”

पोरगा म्हणाला, “महाराज तुम्ही मारलं त्याचं मला कायबी वाईट वाटत न्हाय. पण लिंगायत समाजात चपलेचा मार खाल्ला की तोंड बघत नाईत. जातीत घेत नाईत.

आता मी काय करावं?”

महाराजांनी लागलीच म्हैसकर फौजदारांना बोलावून घेतलं आणि फौजदारांना म्हणाले, या पोराचे नातेवाईक आणि जातीचे पुढारी यांना आज सायंकाळी पापाच्या तिकटीसमोर जमा करा. सोबत शेणकाल्यानं भरलेली बादली आणि फाटके पायताण आणा.

संध्याकाळी लिंगायत जातीची ७०-७५ पुढारी मंडळी पापाच्या तिकटीला जमली. महाराज आले. महाराजांच्या सुचनेनुसार जमलेल्या पुढाऱ्यांना पायतानाचा एक एक तडाखा मारण्यात आला. जमलेले पुढारी म्हणाले, “महाराज आम्ही काय केलं? आम्हाला अशी शिक्षा का?”

तेव्हा महाराज म्हणाले, रागाच्या भरात आम्ही ड्रायव्हर पोरावर चप्पल उगारली. त्याची शिक्षा त्याला जातीतून बाहेर काढायची देता. आता सगळ्यांचीच जात बिघडली आहे…

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.

टीप ; वरील तिन्ही प्रसंग intrnet वरून प्राप्त झालेली आहे फक्त शैक्षणिक माहिती करिता याचा उपयोग केलेला आहे.

Leave a Reply

गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
%d bloggers like this: