Table of Contents
Central Bank Of India Recruitment 2023 For 250 Chief Manager And Senior Manager Grade 3 Posts
Central Bank of India Recruitment 2023 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Bank Jobs) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) बंपर भरती करण्यात येत आहे. सेंट्रल बँकेने याची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 250 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. मुख्य व्यवस्थापक (ग्रेड IV) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (ग्रेड III) या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. यासाठी उमेदवारांना centralbankofindia.co.in या वेबसाईटवर जावं लागेल.
रिक्त जागांचा तपशील
या भरती प्रक्रियेत एकूण 250 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक ग्रेड IV (Chief Manager) आणि वरिष्ठ व्यवस्थापक ग्रेड III (Senior Manager) या पदांवर भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 27 जानेवारीपासून सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
कशी असेल निवड प्रक्रिया?
ही भरती परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा मार्च 2023 मध्ये आयोजित केली जाऊ शकते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्जाची फी किती?
SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल.
उमेदवाराची पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला PSU किंवा खाजगी बँकेत अधिकारी म्हणून किमान सात वर्षे काम करण्याचा अनुभव असावा. त्यांच्यासाठी वयोमर्यादा मुख्य व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 35 वर्षे आहे.
किती पगार मिळेल?
या भरती अंतर्गत निवड झाल्यावर मुख्य व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त 89,890 रुपये वेतन मिळेल आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी वेतन 78,230 पर्यंत आहे. तपशील पाहण्यासाठी centralbankofindia.co.in या लिंकवर क्लिक करा
Source link