माझी माती माझा देश}meri mitti mera desh abhiyan 2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत संपुर्ण राज्यात व देशात “मेरी मिट्टी मेरा देश’ (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमानुसार प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेणे अपेक्षित आहे. सदरचे अभियानामध्ये ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर उपक्रम राबविणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मेरी मिट्टी मेरा देश
मेरी मिट्टी मेरा देश (MMMD) संदर्भात आजच तात्काळ सर्व उपअभियंता, विस्तार अधिकारी (पं/ कृषी), कृषी अधिकारी, ग्रामसेवक, BMM, BM, KC यांना उपरोक्त शासन निर्देशानुसार करावयाच्या सविस्तर कार्यवाहीबाबत अवगत करण्यात यावे. सदरबाबत अजिबात विलंब करू नये.
शिलाफलक उभारणेबाबत, मातीचे दिवे पुरेश्या प्रमाणात उपलब्धतेबाबत व अमृत वाटिकेकरीता ७५ देशी रोपांच्या उपलब्धते संदर्भात आजच निर्णय घेण्यात यावा. तसेच शिलाफलक आणि अमृत वाटिका स्थान निश्चिती आज आणि उद्या दोनच दिवसात अंतिम करणे अत्यंत आवश्यक आहे.
शासनाने मेरी मिट्टी मेरा देश (MMMD) बाबत तालुका नोडल अधिकारी म्हणून सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना प्राधिकृत केले असल्याने अन्य कोणाचीही नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करू नये. परंतु सदर विषयाबाबत अन्य अधिकाऱ्यांचे सहकार्य प्राधान्याने घेण्यात यावे.
तसेच मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील दि. १३, १४ व १५ ऑगस्ट २०२३ रोजी हर घर तिरंगा मोहीम राबवायची आहे. त्याबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2023
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक ०९/०८/२०२३ पासून सुरू होत आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमांतर्गत “पंचप्रण शपथ” हा कार्यक्रम बुधवार दिनांक ०९/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर शपथ खालीलप्रमाणे आहे:-
शपथ
आम्ही शपथ घेतो की,भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू.देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू.भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.
राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा व महाविद्यालये, शासकीय महामंडळे इत्यादी आपल्या आधिपत्याखालील सर्व कार्यालयांमध्ये पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक ०९/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी विनंती करण्यात येत आहे.
1 thought on “माझी माती माझा देश|meri mitti mera desh abhiyan 2023”