SECL Recruitment 2023 South Eastern Coalfields Limited Recruitment For 405 Posts Apply At Secl Cil In

Spread the love

SECL Recruitment 2023 : नोकरीच्या शोधत असणाऱ्या दहावी पास उमेदवारांना चांगली नोकरी (Govt Job) मिळवण्याची संधी आहे. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड (SECL) नोकरीच भरती करण्यात येणार आहे. SECL मध्ये 405 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार www.secl-cil.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरती अंतर्गत मायनिंग सरदार आणि उप सर्वेक्षक पदांवर भरती करण्यात येणार आहे. 

SECL Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील

या भरती प्रक्रियेमध्ये SECL कडून मायनिंग सरदार पदासाठी 350 आणि उप सर्वेक्षक पदासाठी 55 रिक्त जागा भरण्यात येतील.

SECL Recruitment 2023 : अर्ज कुणाला करता येईल?

SECL मध्ये मायनिंग सरदार आणि उप सर्वेक्षक पदावरील भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे प्रथमोपचार आणि गॅस चाचणी प्रमाणपत्र, वैध ओव्हरमन प्रमाणपत्र आणि खाण अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. इतर तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत सूचना तपासू शकता.

अर्ज ऑफलाईन जमा करावा लागेल

इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज दाखल करावेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, उमेदवारांना ऑफलाइन देखील अर्ज करावा लागेल. इच्छुक उमेदवारांना त्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी 07 मार्च 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचवावी लागेल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर केली जाईल. यासाठी अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी, दोन्ही कामांसाठी उमेदवार SECL च्या secl-cil.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.  

पगार किती असेल?

या भरतीअंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना चांगला पगार मिळेल. दोन्ही पदांसाठी  31852 रुपये मासिक वेतन मिळेल.

Source link

Categories job

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये