31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2023 दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी – १ चे आयोजन|Periodic assessment tests; sankalit chachani 1 will be organized from 31 October to 01 November 2023

Spread the love

Periodic assessment tests; sankalit chachani 1 will be organized from 31 October to 01 November 2023

नियतकालिक मूल्यांकन चाचण्या; 31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2023 दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी – १ चे आयोजन करण्यात येणार आहे

STARS (Strengthening Teaching – Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्पामधील SIG २ (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी – १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीचे आयोजन पूर्ण झालेले आहे. सदर चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे परीक्षा साहितय (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) राज्यस्तरावर छपाई करुन या कायालयमार्फत शाळांना पुरवठा करण्यात आलेला आहे.

वाचा   How to register in PFMS for school  (Public Financial Management System)

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ.३री ते ८वी वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी सकलित मूल्यगापन चाचणी १ चे आयोजन दि. ३१ ऑक्टोबर ते ०1 नोव्हेंबर, २०२३ या कालावधील करण्यात येणार आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी – १ साठी छापील परीक्षा साहित्याचा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) पुरवठा राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे. याबाबत पुढीलप्रमाणे सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

 संकलित मूल्यमापन चाचणी – १ (२०२३-२४ साठी) वेळापत्रक

भाषा (सर्व मध्यम )

इयत्ता दिनांक कालावधी गुण
३रि ते ४थी ३०/१०/२०२३ ९० मिनिटे ३०
५वी ते ६ वी ९० मिनिटे ४०
७वी ते ८वी १२० मिनिटे ५०

गणित (सर्व माध्यम )

इयत्ता दिनांक कालावधी गुण
३रि ते ४थी ३१/१०/२०२३ ९० मिनिटे ३०
५वी ते ६ वी ९० मिनिटे ४०
७वी ते ८वी १२० मिनिटे ५०

तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी मध्यम वगळून )

इयत्ता दिनांक कालावधी गुण
३रि ते ४थी ०१/११/२०२३ ९० मिनिटे ३०
५वी ते ६ वी ९० मिनिटे ४०
७वी ते ८वी १२० मिनिटे ५०

महत्वाचे

टीप :- १ प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी .

टीप:- २ प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल.

वाचा   Download the JNV Class 6 Result and Cut Off at navodaya.gov.in for the Class 6 results in 2023.

टीप:-२ सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यावी. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृतीकार्यक्रमाची आखणी करणे हा आहे.

जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25

5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024

Periodic Assessment Test (PAT) Purpose Uses Advantages in marathi

 चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :

१. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

२. चाचणीचे गाध्यम व विषय :- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.

३. चाचणीचा अभ्यासक्रम :- प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल.

४. चाचणीचे स्वरुपः- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.

५. चाचणी निर्मिती- सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.

६. चाचणी कोणासाठी- संकलित मूल्यमापन चाचणी – १ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल

वाचा   महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ|dearness allowance hike with 4% good news for state govt employees

७. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.

८. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या-त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी. ९. शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे

१०. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

११. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुणनोंद करावी. १२. चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी. १३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

१४. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्याचाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.

प्राप्त गुणांची नोंद चॅट बॉट च्या माध्यमातून करणे-

चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट-बॉट वर तत्काळ करणेत यावी.

शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झालेनंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

हे हि वाचा

जागतिक मानसिक आरोग्य दिन

25 सर्वोत्तम कोट;वॉरन बफेट

मीच का” वर प्रेरक आणि भावनिक कोट्स

आजी-आजोबा दिन

शुभ रात्र|50 good night sandesh marathi madhye

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस: शुभेच्छा, कोट आणि विचार

काहीही शाश्वत नाही सुविचार

राष्ट्रीय शिक्षक दिन

शिक्षक दिन 2023  [हिंदी दिवस निबंध संग्रह , भाषण संग्रह , प्रश्नोत्तरी QUIZ ]

विश्व ओजोन दिवस पर 25 एमसीक्यू

हिंदी दिवस

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन: प्रश्नमंजुषा

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d